Protest Against PM Modi: पुण्यात मोदींविरोधात 'या' मागणीसाठी कुकी समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने - PM Modi
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये आहेत. त्यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सकाळपासूनच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. तसेच पुण्यात राहणारे मणिपूरचे नागरिक देखील आज रस्त्यावर उतरले आहेत. महात्मा फुले मंडई येथे विरोधकांच्या वतीने 'गो बॅक मोदी' म्हणत आंदोलन करण्यात आले. पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे विरोधकांसह तब्बल 28 संघटनांच्या वतीने मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला मणिपूर येथील कामानिमित्त, शिक्षणानिमित्त पुण्यात राहणाऱ्या नागरिकांनी देखील आंदोलन केले आहे. कुकी समाजाच्या वतीने निदर्शने करून आम्हाला वेगळे राज्य द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. तरुण रागाच्या भरात ही मागणी करत आहेत, त्याला आमचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी दिली आहे.