Kolhapur Bus Accident : वारणा नदीत गोव्याहून मुंबईकडे जाणारी ट्रॅव्हल्स कोसळली; पाहा व्हिडिओ - Bus Accident

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 11:09 AM IST

कोल्हापूर Bus Accident : कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीवरील कोकरूड पुलावरून आज (9 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे वाया कराडमार्गे खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बुधवारी रात्री पाऊस पडल्यानं रस्ता निसरडा झाला होता. तसेच आज या परीसरात मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं समोरचंदेखील स्पष्ट दिसत नव्हतं. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही बस प्रवाशांना घेऊन या पुलावरून जात असताना अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला अन् बस थेट वारणा नदीच्या पात्रात घसरली. सुदैवानं नदीत पाणी कमी असल्यानं ही बस नदीपात्राच्या कोरड्या भागात जाऊन थांबली. यावेळी बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडले. दरम्यान, ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ जखम झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.