कशी होणार 'Chandrayaan ३' ची सॉफ्ट लँडिंग, तज्ज्ञांकडून जाणून घ्या A to Z - अजिंक्य हुद्दार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 22, 2023, 10:36 PM IST
पुणे : चांद्रयान 3 च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चांद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयानाने 14 जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही. नुकतेच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. चांद्रयानाचे चंद्रावर लँडिंग कसे होणार? तसेच या मोहिमेचा देशाला काय फायदा आहे? याबाबत आमच्या प्रतिनिधीने विज्ञान अभ्यासक लीना बोकील आणि रोबोटिक एक्सपर्ट अजिंक्य हुद्दार यांच्याशी खास बातचीत केली.