Kishori Pednekar Criticized : ईडीला सामोरे जा किंवा भाजपात या; हे दोनच पर्याय - किशोरी पेडणेकर यांची टीका - Governor Bhagat Singh Koshyari
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : महाराष्ट्रात शासकीय यंत्रणांचा सुळसुळाट झाला आहे. या लोकांच्या दाबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर या यंत्रणांचा वापर हे स्पष्ट आहे. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनाही असाच त्रास दिला. अखेर कोर्टाने त्यांना क्लिनचीट दिली आहे. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, रस्त्यावर उतरणारच आहे. शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv sena Leader Sanjay Raut ) यांच्यापाठी शिवसेना आहे. ज्यांच्यावर ईडी लागली त्यानंतर ते दुसरीकडे गेले त्यांच्याबाबत एक शब्दही काढला जात नाही. हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता दोनच पर्याय शिल्लक आहेत, एकतर ईडीला सामोरे जा किंवा भाजपात ( ED or join BJP ) या. ज्यांच्यावर ईडी लागली त्यानंतर ते दुसरीकडे गेले त्यांच्या बाबत एक शब्दही काढला जात नाही. राज्यात आणि देशात दोनच प्रकार शिल्लक आहेत, एकतर ईडीला सामोरे जा किंवा भाजपात या अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माझी महापौर व शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. राज्यपालांच्या विरोधात सह्यांची मोहीम - राज्यपालांचे ( Governor Bhagat Singh Koshyari ) प्रक्षोभक विधान दाबण्यासाठी ही कारवाई झाली असेल, अशा प्रकारच्या टेक्निक बऱ्याच वेळा वापरल्या गेल्या आहेत. तर या गोष्टीने ही हे प्रकरण दाबता येणार नाही. त्यांच्या विरोधात अनेक पक्ष तर आहेतच, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी सह्यांच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. केवळ शिवसेना नव्हे तर एनजीओसुद्धा सह्यांची मोहीम राबवत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST