Jitendra Awhad: शरद पवारांबाबतचा ‘तो’ प्रसंग सांगताना जितेंद्र आव्हाड भावूक; म्हणाले... - Mumbai News
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 7, 2023, 10:51 PM IST
मुंबई Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केल्यानंतर दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हाबाबत पहिली सुनावणी पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडून दावे -प्रतिदावे करण्यात आले.अजित पवार गटाकडून सुनावणी दरम्यान शरद पवारांनी हुकूमशाप्रमाणे पक्ष चालवत असल्याचा आरोप केल्यानं, व्यतीत झालेले शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावर हल्लाबोल (Jitendra Awhad On Sharad Pawar) केला आहे. दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिला जावे याबाबत विनंती केली. दोन्ही गटांच्या वकिलांमार्फत युक्तिवाद पार पडला. सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवाद, आरोप ऐकून व्यतीत होऊन जितेंद्र आव्हाड आज पत्रकार परिषद (Jitendra Awhad Press Conference) घेतली, यावेळी ते भावूक झाल्याचं पाहास मिळालं.
लोकशाही मूल्यांचा आदर करणारा हुकूमशाह कसा ?: निवडणूक आयोगात झालेल्या युक्तिवादत खास काही मुद्दे मांडले गेले नाहीत. कालपर्यंत मी विश्वास ठेवायचो की, या सगळ्यांचं दैवत शरद पवार आहेत. पण काल यांच्या वकीलने शरद पवार यांना हुकुमशाह म्हटलं. कालपर्यंत हे विठ्ठल म्हणत होते, दैवत म्हणत होते. या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता की, शरद पवार हुकूमशाह आहेत? लोकशाही न मानणारे आहेत. तुमचे वकील असे कसे म्हणू शकले असा सवाल अजित पवार गटाला आव्हाड यांनी विचारला आहे.