Jayant Patil Interacted Sanket Sargar : संकेत सरगरशी जयंत पाटलांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत दिल्या शुभेच्छा - Silver Medalist Sanket Sargar
🎬 Watch Now: Feature Video
सांगली : कॉमनवेल्थ ( Commonwealth Games ) स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या ( Silver Medal in Weightlifting ) सांगलीच्या संकेत सरगरचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) ( NCP State President ) यांनी अभिनंदन केले आहे. संकेत याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे जयंत पाटील यांनी संवाद साधला. संकेतचे कौतुक करीत भारताला त्याने मिळवून दिलेल्या कॉमनवेल्थमधल्या पहिल्या रौप्यपदकाबद्दल अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या तब्येतीचीसुद्धा जयंत पाटील यांच्याकडून यावेळी चौकशी करण्यात आली. हाताला फ्रॅक्चर असल्याचे सांगून काही दिवस भारतात आल्यानंतर पटियाला येथे उपचार झाल्यानंतर, सांगलीला येण्याचे संकेतने यावेळी जयंत पाटलांशी संवाद साधताना सांगितले आहे. तर समस्त सांगलीकर जनतेच्या वतीने जयंत पाटलांनी संकेतचे यावेळी अभिनंदन केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST