Panipuri: दोन पंतप्रधान मित्रांची भेट अन् पाणीपुरी खात रंगलेल्या गप्पा, पाहा व्हिडिओ - Japan PM Kishida eats Panipuri
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी नवी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी बाल बोधी वृक्षावर पुष्पहार अर्पण केला. उद्यानात फेरफटका मारताना दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या क्रमात जपानच्या पंतप्रधानांनी येथे गोल गप्पे (पाणीपुरी), लस्सी आणि आम पन्नाचा आस्वाद घेतला. नवी दिल्ली येथे पोहोचल्यावर पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदींसोबत हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी किशिदा यांनी पंतप्रधान मोदींना या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीसाठी आमंत्रित केले. त्याचवेळी, बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधानांना G7 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, दोघांनी पाणीपुरी खाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.