Thane Crime: दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची धडक कारवाई - Ivory Trade
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : तामिळनाडू राज्यातून ठाण्याच्या कोपरी परिसरात दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोन आरोपी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोनी आरोपीकडून दोन हत्तीचे हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहेत. तर या दोघे आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती आहे. हत्तीचे दोन हस्तिदंत एका बॅगमध्ये घेऊन ते विक्री करण्यासाठी ठाण्याच्या कोपरी भागात आले. दरम्यान या विक्री-खरेदी व्यवहाराची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला खबऱ्या मार्फत मिळाली. पोलिसांनी खातरजमा करीत कोपरी परिसरात महामार्गावर हस्तिदंत घेऊन कुणाची थोडक्यात खरीदी करणाऱ्या ग्राहकांची वाट पाहताना पोलीस पथकाच्या दृष्टीस पडले. युनिट-५ च्या पथकाने त्यांना हेरले आणि संशयावरून त्यांना हटकले आणि संशय खरा ठरला. दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन हस्तिदंत मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर दोन हस्तिदंताची किंमत दिड कोटीची असल्याची माहिती आरोपींची पोलिसांना दिली. या दोघे आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांची आहे. अटक दोन्ही आरोपींची पोलीस पथक सखोल चौकशी करीत हे हस्तिदंत कुणाला विकण्यासाठी आणलेले होते. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.