Zakir Naik House : झाकीर नाईक टार्गेटवर; पाहा डोंगरी येथील निवासस्थान परिसरातील व्हिडिओ - Zakir naik house and Office in Dongri
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : दहशतवादाला प्रोत्साहन देणारा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला इस्लामिक उपदेश डॉ. झाकीर नाईकला ताब्यात घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. झाकीर नाईक 2017 मध्ये भारत सोडून फरार झालेला आहे. दरम्यान, झाकीर नाईक मुस्लिम धर्माच्या धार्मिक कार्यक्रमासाठी ओमान येथे जाणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भारतीय तपास यंत्रणांनी झाकीर नाईकला ताब्यात घेण्याच्या हालचालींना सुरूवात केली आहे. झाकीर नाईक मूळचा महाराष्ट्रातील कोकणातला आहे. नाईकचा जन्म 1968 साली झाला. झाकिर नाईकचे कुटुंब मुंबईतील मुस्लिम बहुल परिसर म्हणून व गुन्हेगारीसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या डोंगरी भागात स्थलांतरित झाले. संपूर्ण कुटुंबच वैद्यकीय पेशातील असल्यानं झाकीर नाईक देखील डॉक्टर झाला. त्याचा डोंगरी येथे दवाखाना होता मात्र, त्याचवेळी झाकीर एका इस्लामिक धर्मगुरूंच्या संपर्कात आला आणि त्याचे पूर्ण मतपरिवर्तन झाले होते. दरम्यान, झाकीरच्या मुंबईतील डोंगरी असलेल्या निवासस्थान परिसरातील आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. पाहूयात..