Devendra Fadnavis: मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ - देवेंद्र फडणवीस खाजगी निवासस्थान
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 1, 2023, 3:48 PM IST
नागपूर Devendra Fadnavis: तीन दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आक्रमक झाला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची झळा ही नेत्यांना बसू लागली आहे. अनेक लोकप्रतिनिधींचे घर आणि कार्यालयांची तोडफोड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खासगी निवासस्थानासमोर सुरक्षा व्यवस्था (Fadnavis Residence) वाढवण्यात आलीय.
धरमपेठ या परिसरातील त्रिकोणी पार्कजवळ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खासगी निवासस्थान आहे. एरवी फडणवीस नागपुरात असताना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस नागपुरात नसताना सुद्धा घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. रस्त्यावर ही बॅरिकेट लावण्यात आली आहेत. शहर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहिती प्रमाणे नागपुरात सर्वच पक्षाचे कार्यालय, आमदारांच्या घर आणि कार्यालयासमोर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.