MLA Ravi Patil : निरोगी राहण्यासाठी खेळ महत्वाचे, भाजप आमदार रवि पाटील यांच्या हस्ते टेबल टेनिस अकॅडमीचे उद्घाटन - Raigad News
🎬 Watch Now: Feature Video
आपण स्वतः निरोगी राहण्यासाठी खेळ महत्वाचे असून खेळातून आपल्या शरीर सुदृढ व निरोगी राहते. यामुळे खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी पेण तालुका क्रीडा भवनाची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन, पेणचे भाजप आमदार रवि पाटील ( BJP MLA Ravisheth Patil ) यांनी टेबल टेनिस अकॅडमी उद्घाटन प्रसंगी केले. पेण तालुका क्रीडा भवन येथे रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने टेबल टेनिस अकॅडमीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पेणचे भाजप आमदार रविशेठ पाटील, रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष तथा छत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू, सचिन कडू, रायगड जिल्हा टेबल टेनिस प्रशिक्षक उदय मळेकर, वसंत मनोरे, भाऊ मुजावर, जनार्दन जाधव, हितेश पाटील आदीसंह मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST