नक्षलवाद्यांनी पुलाखाली पेरला विध्वसंकारी आयईडी, जीवाची बाजी लावून जवानांनी केला निकामी; पाहा व्हिडिओ - कोडरोंडा जवळील रेल्वे अंडर ब्रिज
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2023, 1:41 PM IST
कांकेर IED Defused By SSB Soldiers : जनसामान्यांमध्ये दहशत पसरवण्याच्या हेतूनं नक्षलवाद्यांनी अंतागड क्षेत्रांतर्गत तडोकी पोलीस ठाण्याच्या कोडरोंडा जवळील रेल्वे अंडर पुलाजवळ आयईडी पेरला होता. मात्र, एसएसबीच्या जवानांनी नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देत कांकेरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल म्हणाले की, नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सतत शोधमोहीम राबविली जात आहे. कोडरोंडाजवळ एसएसबी जवानांचे एक पथक झडतीसाठी गेली होते. त्यावेळी त्यांना रेल्वे ट्रॅकवर एक आयईडी दिसला. एसएसबीच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावरून आयईडी काढत तो निकामी केला. हा आयईडी 3 किलोचा असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी (21 नोव्हेंबर) संध्याकाळी अरणपूर, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात बस्तर फायटरचे दोन जवान जखमी झाले. यापूर्वी दंतेवाड्यातच जवानांनी अनेक आयईडी जप्त केले होते. लोहा गावाच्या वाटेवर जवानांनी 10 किलो वजनाचा आयईडी जप्त केला होता. तो निकामी केल्यानं अनेकांचे प्राण वाचले.