Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग, हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन - Muslim brothers participated wari

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 29, 2023, 1:29 PM IST

छत्रपती संभाजीनगर : राज्यात जाती जातीवरून राजकारण तापत असताना सामाजिक दरी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम धर्मियांनी एकतेचे दर्शन दाखवले. वरूड काझी येथे निघालेल्या विठुरायाच्या पालखीवर मशिदिवरून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर मुस्लिम बांधवांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांना जात धर्म पंथ नसतो, असा संदेश दिला. विठ्ठल नामाच्या जयघोषात संभाजीनगरपासून 20 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या वरुड काझी येथे मुस्लिम बांधव विठुरायाच्या वारीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. टाळ मृदुंग वाजवत वारकऱ्यांच्या वारीवर मशिदितून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी वारीमध्ये सहभाग घेतला आहे. वारीमध्ये जसे वारकरी फुगडी खेळतात, अभंग म्हणत टाळ वाजवत विठुरायाचे स्वागत करतात. तसेच करत गावातील निघालेल्या दिंडीत मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी देखील यात सहभाग घेत पोलीस आपले मित्र असतात असा संदेश दिला. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा जपण्याचे काम गावकरी करतात. गावात सर्व गावकरी एकत्रित सण साजरे करतात. त्यामुळे जातीय सलोखा टिकून असल्याची माहिती सरपंच दिलावर बेग यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून हिंदूंचा पवित्र सण आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाची असलेली बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. त्यानिमित्ताने हिंदू बांधवांच्या सणाचे पावित्र्य ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय गावासह परिसरातील बांधवांनी घेतला घेतला आहे. सण दुसऱ्या दिवशी साजरा करता येईल, मात्र बंधुभाव जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणी कितीही जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी महात्मा गांधी यांनी ईश्वर अल्हा तेरो नाम, सबको संमती दे भगवान या वाक्याचा प्रत्यय येत असल्याचे हिंदू बांधवांनी सांगितले. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.