Hindu Muslim Devotees टाळमृदंगाच्या तालावर हिंदू मुस्लीम भाविकांची फुगडी ; पाहा वारकर्‍यांनीं लुटला फुगडी खेळण्याचा आनंद - Hindu Muslim devotees dance beat of talamridanga

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 20, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

अहमदनगर अवघ्या जगाला पसायदान देणार्‍या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी टाळमृदंगाच्या तालात विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांचा मेळा आळंदीच्या दिशेने जात Hindu Muslim devotees dance beat of talamridanga आहे. यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग वारकर्‍यांनी दुमदुमून गेला Hindu Muslim devotees dance in dindi आहे. या सर्व दिंड्यांना गावोगावी चहापाणी व नाष्ट्याची सोय करण्यात आलेली आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा येथे चहापाण्यासाठी विसावा घेतलेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत भिकनभाई शेख यांनी सहभाग घेत फुगडी खेळत आनंद Hindu Muslim Devotees लुटला. बोटा येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक लक्ष्मण नन्हुजी पावडे यांच्या घरी झोळे येथील दिंडी चहापाण्यासाठी थांबली होती. यावेळी टाळमृदंगाच्या तालावर विठुरायाचा जयघोष करीत अभंग सुरु असताना आदर्श शिक्षक लक्ष्मण पावडे यांनी शेजारी राहणाऱ्या भिकन शेख यांना फुगडी खेळण्यासाठी बोलावले. यावेळी भिकन शेख यांनी सहपरिवार दिंडीत सहभागी होते. शिक्षक लक्ष्मण पावडे यांच्यासोबत टाळमृदंगाच्या तालावर विठुरायाचा जयघोष करत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बोटा परिसरात व्हायरल झाला. अनेकांनी व्हिडीओचे स्टेटस ठेवले. जे हिंदू मुस्लिम एकोपा Hindu Muslim devotees dance in dindi दर्शवते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.