Cat Head Stuck : मांजरीचे डोके अडकले भांड्यात!..असा वाचला जीव, पहा व्हिडिओ - Cat Head Stuck Video
🎬 Watch Now: Feature Video
वैशाली (बिहार) : बिहारच्या वैशालीमध्ये एका घरात एक मांजर दुधाच्या लोभाने घुसली. घरात शिरताच मांजराची नजर एका भांड्यावर पडली. भांड्यात दूध असण्याची शक्यता पाहून मांजरीने त्यात डोकं घातलं. मग काय, मांजराचे डोके भांड्यातच अडकले! डोके भांड्यात अडकताच ती तडफडायला लागली. ती संपूर्ण घरात इकडे तिकडे धावू लागली. घरातील कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मांजर फार प्रयत्न करते. ती कधी खिडकीवर चढते, तर कधी पडद्यावर. कधी खाली येते, तर कधी गोल गोल फिरते. पण मांजर त्या भांड्यातून स्वत:चे डोके बाहेर काढू शकत नाही. तासाभरानंतर घरातील लोकांनी मांजरीच्या अंगावर बांबू मारला. त्यानंतर मांजरीचे डोके भांड्यातून बाहेर आले. मात्र या घटनेमुळे मांजरीच्या तोंडाला जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.