MPSC Hall Ticket Data Leak : एमपीएससी उमेदवारांचा हॉल तिकीट डेटा लिक, विद्यार्थ्यांची चौकशीची मागणी - Exam Hall Ticket Data Leak
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18326043-thumbnail-16x9-mpsc.jpg)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या गट ब, क जागेसाठी होणाऱ्या परीक्षेचा हॉल तिकीटचा डेटा लिक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे 94 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोकात आल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन यावरती एक समिती नेमून चौकशी करा अशी मागणी केली आहे. एमपीएससीचा डेटा झाल्याची माहिती हॅकर देत असला तरी, एमपीएससीकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलेला आहे. या संदर्भात तुमची कुठलीही माहिती आम्ही लिक केलेली नाही, परीक्षेची तारीख 30 असल्यामुळे या ठिकाणचे पेपर सुद्धा लिक झालेली नाही, असे स्पष्टीकरण आता लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेला आहे. या प्रकराची आयोगाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.