Gypsy Accident In Lahaul Spiti लाहौल स्पीती येथील जिप्सी रॅलीत भीषण अपघात, थरारक व्हिडीओ व्हायरल - लाहौल स्पितीत भीषण अपघात
🎬 Watch Now: Feature Video

हिमाचलच्या लाहौल स्पिती जिल्ह्यातील दारचा येथे रॅली दरम्यान भिषण अपघात झाला. शिंकुला येथे जिप्सी रॅली आयोजित करण्यात आली होती. अपघात इतका भिषण होता की जिप्सी रस्त्यावरून खाली लोटली गेली. या रस्ता अपघातात जिप्सीमधील चालक व नॅव्हिगेटरला किरकोळ दुखापत झाली आहे. रॅलीच्या आयोजकांनी दोन्ही स्वारांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मंगळवारी, हिमालयाच्या रॅलीच्या तिसऱ्या टप्प्याला दारचा येथून तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. रामलाल मार्कंडा यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देश-विदेशातील लोकांना लाहौलच्या अनोळखी पर्यटन स्थळांची माहिती अशा कार्यक्रमांनी मिळेल आणि आगामी काळात लाहौलमधील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा २८ ऑगस्ट रोजी अटलबिहारी पर्वतारोहण संस्था मनाली येथून सुरू करण्यात आली. स्पर्धकांनी सुमारे ६५० किमीचे अंतर कापले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST