Gun Firing In Qawwali Program Sangli कव्वाली कार्यक्रमामध्ये हवेत गोळीबार माजी नगरसेवकाकडून गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल - Gun Firing in air by former corporator

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 14, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

सांगली कव्वाली कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरुन हवेत गोळीबार Gun Firing In Qawwali Program Sangli केल्याचा प्रकार घडल्याच्या व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये Gun Firing In Qawwali program Islampur Sangli दोन दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्त जंगी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते. यावेळी हा राष्ट्रवादी काँग्रेसचच्या माजी नगरसेवकाने हा गोळीबार केल्याचा व्हिडीओ असल्याची चर्चा सुरू आहे. NCP former corporator Firing in Qawwali Sangli कव्वाली सुरू असताना हवेत फायरिंग इस्लामपूर शहरात ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त अमिल आरिफ साबरी कादरी यांच्या शानदार कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कव्वालीचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमामध्येच एका व्यक्तीने व्यासपीठावरून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. कार्यक्रमांमध्येच या व्यक्तीकडून रिवाल्वर काढून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे. ही व्यक्ती कोण, या बाबतीत माहिती मिळू शकली नाही. ही व्यक्ती हा इस्लामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असल्याची चर्चा सुरू आहे. फायरिंगचा तो व्हिडिओ व्हायरल दरम्यान या याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची नोंद नाही. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता इस्लामपूर पोलीस याची दखल घेऊन तपास करत कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.