Gudhi Padva 2023: साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार; कलशावर उभारली गुढी - Kalash on Sai Baba

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 22, 2023, 12:31 PM IST

शि़र्डी (अहमदगर):  गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज सर्व ठिकणी आनंदी वातावरण आहे. आज साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार करण्यात आला होता. सकाळीच साडे सहा वाजता साईबाबा मंदीराच्या कळसा जवळ साईबाबा संस्थानचे अध्यक्ष यांंनी विधीवत पुजा केली. साई मंदीरातील सर्व धार्मिक पुजा विधी पंचागा प्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पुजा साई मंदीराचे पुजारी यांनी पौरोहित्य यांनी केले. तर मराठी नववर्षाची सुरूवात ठिकठिकाणी गुढी-तोरणे उभारुन केली जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदीरावरच्या कलशावर आज गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या सुविद्य पत्नी मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते साईमंदीरावर गुढी आणि पंचागाची विधीवत पुजा करत श्रध्देची गुढी उभारण्यात आली आहे. तर शिर्डी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रतुन मोठया प्रमाणात साईभक्तांनी शिर्डीत येवुन साईंबाबांचे दर्शन घेतले. गुढीपाडव्याच्या दिवशी कडु निंंबाच्या पाणाला विशेष महत्व आहे. निंब जरी कडु असला तरी तो आरोग्यास हितकारक आहे. साईबाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडु घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. आज साईंचे दर्शन घेत अनेक नविन संकल्प या मराठी नववर्षाच्या निमीत्ताने साईभक्त करतात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.