Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या खरेदीची लगबग, पाहा व्हिडिओ - गणेशोत्सवासाठी ढोल ताशे खरेदी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 10, 2023, 5:28 PM IST
मुंबई Ganeshotsav 2023 : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी अनेक भाविक तयारीला लागले आहेत. बाजारामध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी गणेश भक्तांची तुंबळ गर्दी आपणास पाहायला मिळतेय. गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी त्याचप्रमाणं बाप्पाच्या आरती आणि भजनासाठी लागणारे ढोल, ढोलक आणि पखवाद, ताशा यांच्या खरेदीसाठी तुफान गर्दी होत असल्याचं मुंबईत दिसून (dhol tashas to welcome Ganapati Bappa) येतंय. बाप्पाचं आगमन प्रत्येकाला सुखावणारं आहे. या उत्सव काळात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीतील ढोल पथकं हे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. सगळीकडे याची मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. बाप्पाचं आगमन हे संगीतमय करण्यासाठी बाजारात आता ढोल ताशांच्या खरेदीची लगबग सुरू (Mumbai Ganeshotsav) झालीय.