Ganeshotsav २०२३ : रायगडावरील दिमाखदार मेघडंबरीत विराजमान ‘लालबागचा राजा’; पाहा व्हिडिओ - ganeshotsav 2023 Lalbaugcha Raja

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 8:55 AM IST

मुंबई : Ganeshotsav २०२३ : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja 2023)  प्रथम दर्शन मुंबईकरांना (Lalbaugcha Raja First Look) झालं.'शिवशाही' थाटात सिंहासनावर आरूढ झालेल्या राजाला पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले की, यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे होत (Shivaji Maharaj Rajyabhishek Ceremony) आहेत. त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी रायगडावरील दिमाखदार मेघडंबरी उभी (Raigad Meghdambari Look) करण्यात आली आहे.

मेघडंबरीत विराजमान ‘लालबागचा राजा’ : मेघडंबरी हे यंदाचं राजाचं आकर्षण आहे. याच मेघडंबरीत बाप्पाला विराजमान करण्यात आलंय. स्टेजवर भव्य शिवमुद्रा, प्रभावळीसह १६ फुटांची लालबागच्या राजाची दिमाखदार मूर्ती भाविकांसाठी मोठे आकर्षण आहे. पडदा उठला आणि तुतारी, नगारा वाजवून, मानाचा मुजरा करून मावळ्यांनी शिवछत्रपतींना मानवंदना देत राजाचं दर्शन भाविकांना खुलं झालंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.