Ganesh Visarjan 2023: शिवरायांच्या उद्घोषात लालबागच्या राजाला भाविकांचा निरोप - गणेश विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 28, 2023, 11:05 PM IST
मुंबई Ganesh Visarjan 2023: लालबागच्या राजाची विसर्जनाची शाही मिरवणूक मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडतात भव्य स्वागत लालबागच्या राजाचे करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत लालबागच्या राजाला मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर इंद्र जिमी जम्भ पर या गाण्याने शिवरायांचा जय जयकार करत लालबागच्या राजाचे जंगी स्वागत करण्यात आले. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी (Lalbaghcha Raja Visarjan Miravnuk) पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणुकांवर (Lalbaghcha Raja Visarjan) पोलिसांचं विशेष लक्ष होतं. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी झाले होते. त्याकरिता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती.