Ganesh Visarjan २०२३ : पुण्यात दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जन मिरवणूक; भक्तांमध्ये उत्साह कायम
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : Ganesh Visarjan 2023 : पुण्यात काल सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका आज दुसऱ्या दिवशीही सुरुच आहेत. एक दिवस उलटून गेला असला तरीही गणेश भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाच वातावरण पाहायला मिळतंय. काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीला सुरवात झाली. यंदा मानाच्या गणेश मंडळांच्या विसर्जनाला तब्बल आठ तास लागले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानं दुपारी मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि रात्री 9 वाजल्याच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जनही झालं. मिरवमूकीदरम्यान भर पावसातही भाविकांकडून बाप्पाला निरोप देण्यात येत होता. रात्री बारानंतर मंडळांना डीजे वाजविण्यास थांबविण्यात आले. शहरातील इतर रस्त्यांवर मिरवणूक थांबलेली असली तरी मात्र लक्ष्मी रस्त्यावर आज सकाळीही मिरवणूक सुरूच होती.