Ganesh Festival 2023: राज्यावरील विघ्न दूर ठेवावे; अशोक चव्हाण यांचं बाप्पाला साकडं - Ganesh Festival 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 11:05 PM IST

मुंबई Ganesh Festival 2023:  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील घरी गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यावरील विघ्न दूर करून जनतेला संपन्न ठेवावे, अशा प्रकारचे साकडं त्यांनी गणपतीला घातले आहे. (Ashok Chavan  establishment of Ganarayas) गणपती बाप्पाची प्रतिष्ठापनेची गेली 50 वर्षांची परंपरा चव्हाण कुटुंबानी आजही सुरू ठेवली आहे. माझे वडील शंकरराव चव्हाण आणि आई कुसुमताई यांनी 50 वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही आम्ही जपली आहे. आज आमच्या घरात मोठ्या मनोभावे गणरायांची पूजा करून सपत्नीक आरती केली. आमच्या कुटुंबासाठी हा मोठा सण आणि सुखद अनुभव असतो. (Congress leader Ashok Chavan) देशातील, राज्यातील, माझ्या मतदारसंघातील नागरिकांची, सर्वांची दुःख दूर व्हावी, विघ्न दूर होवो, अडचणी दूर होवो आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त व्हावी अशा प्रकारे बाप्पाकडे साकडं घातलं असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले. तसेच गेहलोत आणि अशोक चव्हाण यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी खासदार संजय निरूपम आदी नेते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.