Ganesh Festival 2023: लालबागच्या राजाच्या खजिन्यात १ कोटी जमा, दर्शनस्थळी चेंगराचेंगरीची परिस्थिती

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 11:07 PM IST

मुंबई Ganesh Festival 2023: लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद कालपासून सुरू करण्यात आली . काल 42 लाखांची रक्कम जमा झाली होती. तर आज 60 लाख 62 हजार इतकी रक्कम दानपेटीत जमा झाली होती. म्हणजेच दोन दिवसात एक कोटी दोन लाख 62 हजार इतकी रक्कम दानपेटीत जमा झाली असल्याचे लालबागचा राजा (King of Lalbagh) मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले आहे. दररोज लाखो भाविक लालबागचा राजाचे दर्शन (Donation of money to the king of Lalbagh) घेण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे असतात. मात्र चरण दर्शनासाठी स्टेजवर गेल्यानंतर त्यांना ओढून बाहेर काढले जाते. हे चित्र दरवर्षीचेच आहे. मात्र व्हीआयपी मंडळींना राजकीय मंडळींना आणि सेलिब्रिटींना अगदी रस्ता मोकळा करून संरक्षणाचे रिंगण तयार करून स्टेज पर्यंत नेले जाते आणि आरामात बाप्पाचे दर्शन दिले जाते. यादरम्यान भाविकांची गर्दी वाढत जाते आणि रांगेतील भाविक खोळंबले जातात. ही दरवर्षी होणारी परिस्थिती असली तरी यंदा पहिल्या दोन दिवसातच रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने लालबागच्या राजाच्या मंडपात चेंगराचेंगरीची परिस्थिती ओढावण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

या गर्दीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शना करिता आलेल्या भाविकांचे हाल होत असून खूपच गंभीर परिस्थिती आहे. स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातील गणपती बाप्पाची सेवा करा, सुरक्षित राहा अशा प्रकारचे मेसेज देखील व्हिडीओसोबत व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की हा भाविकांच्या बेशिस्तीचा प्रकार आहे की मंडळाच्या व्यवस्थापनाचा अभाव आहे. या व्हिडिओत आपण जर व्यवस्थित पाहिला तर एक लहान मुलगा हातातून निसटताना दिसतोय. मात्र, त्या लेकराला एका माणसाने हातात झेलले आहे. श्वास कोंडणारी ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.