Ganesh Chaturthi 2023: गणरायाला सोन्याचा साज चढवण्यासाठी सजली बाजारपेठ, सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांना वाढली मागणी - गणेश उत्सव 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 13, 2023, 10:07 AM IST
मुंबई : Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा (Ganeshotsav 2023) केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गणेशोत्सवासाठी आतुर असते. गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढवण्यासाठी झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. तसंच लालबाग, दादर आधी ठिकाणी असलेल्या स्वस्त दरातल्या दागिन्यांची बाजारपेठ देखील खुलून आली आहे. सोन्याचा दर दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येकालाच सोन्याचे दागिने बाप्पासाठी खरेदी करणं शक्य नसतं. म्हणूनच एक ग्राम सोन्याचे किंवा सोन्याचा मुलामा दिलेले अथवा चांदीचे दागिने भाविक आपल्या बापाला सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. अगदी दोनशे रुपयांपासून ते पंचवीस हजार आणि लाखोंच्या घरात मोठ मोठे गणपती बाप्पाचे हार, सोंडपट्टा, कंबरपट्टा, मुकुट, उंदीर मामा, जास्वंद, केवडा, दुर्वा अशा प्रकारचे नानाविध प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या दागिन्याऐवजी कमी पैशात उपलब्ध होणारे एक ग्राम सोन्याचा मुलामा दिलेले दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असल्याची माहिती, 'मी फणसगावकर ज्वेलर्स' या दुकानाच्या मालकानं दिली आहे. लालबागमधील पेरू कंपाउंडमध्ये असलेल्या 'मी फणसगावकर' दुकानात लालबागच्या राजाला ज्याप्रमाणे साज चढवला जातो, त्याचप्रमाणे छोटा मूर्तीसाठी दागिने बनवली जातात. त्याला देखील ग्राहकांची मोठी पसंती असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.