Dolphin in Ratnagiri चक्क कोकणातील समुद्रकिनारी डॉल्फिन, ड्रोनमध्ये कैद झालेला मुक्तसंचार पहा - छायाचित्रकार सुप्रियांतो खवळे
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी रत्नागिरी जवळच्या भाटये समुद्रात डॉल्फिनचा मोठा कळप समुद्रात मुक्त विहार करताना दिसून आला. पर्यटकांना ही नवी पर्वणी असून छायाचित्रकारांसाठीही पर्वणी ठरत आहे. रत्नागिरीतील छायाचित्रकार सुप्रियांतो खवळे यांनी डॉल्फिनचा हा मुक्त विहार ड्रोन कॅमेरातून शूट केला आहे. मुक्त विहार करणाऱ्या डॉल्फिनच्या या झुंडीची दृश्य छायाचित्रकार सुप्रियांतो खवळे यांनी आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केली आहेत. घोळक्याने पोहणारे आणि मध्येच पाण्याच्या बाहेर सुंदर अशी उडी मारणारे डॉल्फिन बघणं खरंच एक वेगळा आनंद देऊन जातात. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर डॉल्फिनला असुरक्षित वाटेल असं काही नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या किनाऱ्या लगद मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचा वावर वाढलेला दिसत आहे. पर्यटकांना ही एक पर्वणी असून पर्यटन वाढीला याचा मोठा फायदा होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST