Pune Shitladevi Temple Theft : शितळादेवी मंदिरात चोरट्याने देवीची माफी मागत फोडल्या चार दानपेट्या - देवीची माफी मागत फोडल्या चार दानपेट्या
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील कोथरूड येथील शितळादेवी मंदिरात चोरी घटना ( Pune Shitladevi Temple Theft ) झाली आहे. मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि पितळची घंटा असा 77 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना कर्वेनगर येथील मारुती भैरवनाथ मंदिरात घडली आहे. चोरट्याने देवळात प्रवेश केल्यानंतर देवाच्या हात जोडून पाया पडला, त्यानंतर नतमस्तक होत प्रणाम आणि कानाला दोन्ही हात लावून देवाची माफी मागून दानपेटीचे कुलूप फोडल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात ( Warje Police Thane Pune ) चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थानाचे व्यवस्थापक सागर तनपुरे (40, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्याने मंदिराची कुलप तोडून आत प्रवेश केला. यानंतर चारही दानपेट्या फोडून 75 हजारांची रोकड आणि पितळेची घंटा चोरली आहे.