Border Dispute : प्रकरण न्यायालयात असेपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; उद्धव ठाकरेंची मागणी - उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
सीमाप्रश्न Border Dispute सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तरी देखील कर्नाटकची मुजोरी ही सातत्याने वाढत आहे. कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. जो पर्यंत हा विषय न्यायालयात आहे तो पर्यंत वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर disputed area be declared Union Territory करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Former CM Uddhav Thackeray demand यांनी केली आहे. आता पर्यंत किती ठराव झालेत तरी देखील मराठी भाषिकांवर कानडी अत्याचार सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ निषेध करून चालणार नाही, कर्नाटक सरकार त्याला काहीच किंमत देत नाही, असे देखील उद्धव ठाकरे Former CM Uddhav Thackeray म्हणाले आहेत. बॉम्ब तर बरेच आहेत केवळ पेटवण्याचा अवकाश आहे. गायरान जमीन घोटाळा समोर आला असून अनैतिक सरकारकडून काय अपेक्षा करणार, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शेतकरी वाऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करत आहेत. एवढ्या दिल्ली वाऱ्यात सीमा प्रश्न कुठे आहे, शेतकऱ्यांना मदत कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी करत विरोधी पक्षाला बोलू दिल जात नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST