Ganesh Visarjan: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण थिरकले गणेश विसर्जन मिरवणूकीत, पाहा व्हिडिओ - Ashok Chavan danced in Ganesh Visarjan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 3:12 PM IST

मुंबई Ganesh Visarjan: आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जातोय. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थावरून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली होती. यावेळी अशोक चव्हाण हे वाद्यांच्या तालावर आपल्या कुटूंबियांसोबत थिरकताना दिसले. त्यांनी आज गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतलाय. मुंबईतील त्यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानावरून गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणूकीत चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण, तसेच त्यांच्या कन्या यांनी वाद्यांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला. तर, अशोक चव्हाण यांनीही यावेळी गणरायाला निरोप देताना जल्लोषात नृत्य केलं. (Ashok Chavan danced in Ganesh Visarjan) अतिशय आनंदमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.