Devotees Showered With Flowers : केदारनाथ धामचे उघडले दरवाजे; भाविकांवर हेलिकॉप्टरमधून झाली पुष्पवृष्टी - पुष्पवृष्टी
🎬 Watch Now: Feature Video
रुद्रप्रयाग : बाबा केदारनाथ यांच्या मंदिराचे आज दरवाजे उघण्यात आल्याने भाविकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. केदारनाथ परिसरातील हवामान खूप थंड आहे. मात्र प्रथमच केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी हेलिकॉप्टरने भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे भाविकांना मोठा आनंद झाल्याने संपूर्ण परिसर बाबा केदारनाथच्या जयघोषाने दुमदुमून गेला. आज केदारनाथ धामचे दरवाजे सहा महिन्यांसाठी उघडण्यात आले आहेत. रावल भीमाशंकर लिंग पुजारी व आचार्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. मंदिराचे दरवाजे उघडताना सैन्य बँडसह भजन, कीर्तनाने केदारनाथ धाम दुमदुमून गेले. दरवाजे उघडताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी शासनाकडून मुख्यमंत्र्यांचे सल्लागार बी डी सिंह यांच्यावर सोपवण्यात आली. केदारनाथांच्या पंचमुखी डोलीवरही पुष्पवृष्टी करण्यात आली.
हेही वाचा - Chardham Kedarnath Yatra : केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडणार, 23 क्विंटल फुलांनी सजले मंदिर