Unprovoked Firing By Pakistan : जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार; स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ - अरनिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 12:09 PM IST

जम्मू-काश्मीर Jammu and Kashmir : जम्मू सीमेवर अरनिया भागात काल (26 ऑक्टोबर) रात्री पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानं स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तसंच सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झालं. या गोळीबारावेळी अनेक जण बंकरमध्ये लपले. तसंच घडलेल्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देत असताना स्थानिकांची भीती त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होती. 'रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक गोळीबार सुरू झाला. हे जवळपास 4-5 वर्षांनी घडलं. या घटनेनंतर सर्व घराबाहेर पडायला घाबरतायत', अशी प्रतिक्रिया तेथील एका स्थानिकानं दिली. तसंच पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा एक जवान किरकोळ जखमी झाला. या जवानाला उपचारासाठी जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलंय. दरम्यान, याआधी गुरुवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्करानं पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. काश्मीर झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी मारले गेले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.