Fire In Thane : ठाण्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली भीषण आग; 11 दुचाकींसह 3 कार जळून खाक - आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 15, 2023, 12:59 PM IST
ठाणे Fire In Thane : ठाणे महापालिकेच्या समोरील सरोवरदर्शन इमारतीमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडयांना मंगळवारी रात्री भीषण आग लागली. इमारतीमधील तळ मजल्यावर पार्किंग असून त्यात इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या अनेक गाड्या उभ्या असतात. मंगळवारी रात्री जवळपास 1.00 वाजताच्या सुमारास या पार्किंगमधील गाडयांना आग लागली. या आगीत एकूण 13 दुचाकी व 3 चारचाकी वाहनांना आग लागली. यापैकी तब्बल 11 दुचाकी आणि 3 चारचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच ठाण्याचे अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून गाड्या वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. नक्की आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. हा घातपात आहे की अपघात याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.