Fire Broke Out In Mumbai: साकीनाका परिसरातील इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही - आगीवर नियंत्रण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 9, 2023, 12:46 PM IST
मुंबई : Fire Broke Out In Mumbai: मुंबईत आगीच्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसून येत आहे. (Fire Broke Out at Building) अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. साकीनाका परिसरातील 90 फूट रस्त्यावरील साकी सीएचएस, डिसूझा कंपाउंड इमारतीच्या मीटर बॉक्स कॅबिनला आग लागली आहे. ही आग लेव्हल वन असून मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आग लागली तेव्हा इमारतीत 40 ते 50 लोक अडकले होते. (Fire News) अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं (Mumbai News) आहे.