Fight During River Rafting : गंगा नदीत राफ्टिंग दरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
ऋषिकेश, उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे गंगा नदीत राफ्टिंग करताना वेगवेगळ्या राफ्टमध्ये बसलेल्या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की राफ्टिंग करताना काही लोक एकमेकांना राफ्टिंग पॅडल मारताना दिसले. त्यानंतर एका व्यक्तीने नदीत उडी मारली. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा वाद कशावरून झाला हे कळू शकलेले नाही. पण व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे लोक एकमेकांवर लाथा - बुक्क्यांनी हल्ला करताना दिसत आहेत, त्यावरून हा वाद किरकोळ नसावा असा अंदाज बांधला जात आहे. मुनी की रेती पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर रितेश शाह यांनी सांगितले की व्हायरल व्हिडिओची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. सध्या या घटनेची कोणतीही तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली नसून, व्हायरल झालेल्या व्हिडियोची दखल घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.