Video ख्रिस्ती बांधवांतर्फे हंगामाचा सण मोठ्या उत्साहात साजरा - Christian brothers in Manmad
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक मनमाड येथील संत बार्णबा चर्च मध्ये हंगामाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. festival of seasons celebrated शहरातील ख्रिस्ती बांधवांनी हंगामातील पहिले धान्य फळ प्रभू येशुला अर्पण करत हा सण साजरा केला. यावेळी संत बार्णबा चर्चचे मुख्य पाळक रेव्हेरेंट फिलिप वरा यांनी प्रार्थना करत सर्व धान्य पालेभाज्या फळे आशिर्वादित केले. यानंतर या सर्व वस्तुंची विक्री करून मिळणारे पैसे हे चर्चला दान म्हणून देण्यात आले. नाताळचा सण साजरा करण्याअगोदर नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा हंगामाचा सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची आगळीवेगळी परंपरा असून दरवर्षी प्रमाणे यंदा ही आज चर्चच्या आवारात हंगाम सण म्हणून हा सण साजरा करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST