The Father Killed The Daughter: निर्दयी पिता! अडीच महिन्यांच्या मुलीची केली हत्या - Girl Body Recovered From Box

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 29, 2023, 7:39 PM IST

पटना: बिहारची राजधानी पटनामध्ये एका व्यक्तीने आपल्या अडीच महिन्यांच्या मुलीची (पटना बेबी मर्डर) हत्या केली आणि मृतदेह स्वयंपाकघरात ठेवलेल्या बॉक्समध्ये बंद केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुली दिली की आठवडाभरापूर्वीही आपण मुलीच्या नाकात फेविक्विक टाकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर तिचा जीव वाचला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याने मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरात ठेवलेल्या बॉक्समध्ये ठेवला होता. त्याची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने आपल्या मुलीच्या गळ्यात फास बांधून खून केल्याचे कबूल केले आहे. भरतने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस तपासात गुंतले होते. त्याचवेळी पोलिसांनी घरातील स्वयंपाकघरातील डालडा बॉक्समधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला. अडीच महिन्यांच्या मुलीची हत्या कोणी आणि का केली असेल, हे जाणून घ्यायचे होते. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमत होता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि मुलीचा खून करणारा दुसरा कोणी नसून तिचे वडील भरत असल्याचे समोर आले. ही मुलगी सतत आजारी असायची. तसेच, तीच्या छातीला एक छेद असल्याने तो तिच्या उपचाराला कंटाळला आणि शेवटी त्याने हा निर्दयी निर्णय घेतला अशी माहितीही समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.