Exclusive : आसाममधील 'त्या' हॉटेलला छावणीचे रुप - Exclusive
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी ( आसाम ) - शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) व त्यांच्यासोबत असलेले आमदार आसामच्या गुवाहाटी येथील ज्या हॉटेलमध्ये सध्या वास्तव्यास आहे त्या हॉटेल रेडीसन ब्लूला छावणीचे ( Redissan Blu Hotel ) रुप आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवस सुरू असलेल्या राजकीय बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले. शिवसेनेला हा हादरा असताना आता सात आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, संजय राठोड या आमदारांचा समावेश आहे. हे सर्व आमदार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST