Japanese encephalitis : पुण्यात नव्या विषाणूची एंट्री ; शहरात प्रथमच 'जॅपनीज इन्सेफेलायटीस'चा रुग्ण आढळला - पुण्यात नव्या विषाणूची एंट्री
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17086218-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे शहरात प्रथमच 'जॅपनीज इन्सेफेलायटीस' (Japanese encephalitis) (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे. ही बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील ४ वर्षांच्या बालकावर ३ नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला असून, तो 'जेई' पॉझिटिव्ह आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याबाबत सहाय्यक आरोग्य प्रमुख संजय वावरे यांनी माहिती दिली. (Entry of new virus in Pune )
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST