Sharad Pawar : मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन केली शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस - शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. sharad pawar health. शरद पवार गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये Breach Candy Hospital प्रकृती अत्यावस्थेच्या कारणामुळे दाखल आहेत. जवळपास पंधरा मिनिटं त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडताना प्रसारमाध्यमांना पवार यांची प्रकृती बरी असल्याची माहिती दिली. उद्या शिर्डीमध्ये शिबिराच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहून नंतर इतर ज्या काही तपासण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शरद पवार यांना 31 ऑक्टोबरला मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST