Video इलेक्ट्रिक बाईक वापरताय मग हा व्हिडीओ पहाच भररस्त्यात ई बाईकने घेतला पेट - अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली
🎬 Watch Now: Feature Video
नाशिकच्या गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथे फुटपाथवर पार्क केलेल्या ई बाईकने अचानक पेट घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी ( E-bike caught fire in Nashik ) घडला. यावेळी आजूबाजूच्या व्यवसायिकांनी वेळेत सावधानगिरी बाळगून त्यांच्याकडील आग प्रतिरोधक पावडर फवारली. मात्र दोन-तीन वेळा प्रयत्न करून सुद्धा आग आटोक्यात आली नाही. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग ( Fire fighters extinguished the fire ) विझवली. इलेक्ट्रिक वाहने पेट घेण्याच्या घटना वारंवार घडत असून अशातच नाशिकच्या गंगापूर रोड विद्या विकास सर्कल येथे खरेदी करण्यात साठी आलेले रवींद्र आव्हाड यांनी आपली ही बाईक रस्त्याच्या बाजूला पार्क केले होती. काही वेळानंतर बाईकमधून धूर निघू लागला आणि काही सेकंदात गाडीने अचानक पेट घेतला. यावेळी व्यावसायिकांनी आग विझविण्यासाठी आग प्रतिरोधक पावडरची फवारणी बाईकवर केली. मात्र दोन-तीन वेळा फवारणी करून सुद्धा आग विझली नाही. अखेर अग्निशामक दलाचा बंब दाखल होऊन ही आग आटोक्यात आली. यावेळी परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST