Gangster bablu: पोलिसांचा अन् गँगस्टर बबलू यांच्यातील चकमकीचा ड्रोन व्हिडिओ आला समोर - गँगस्टर बबलू यांच्यातील चकमकीचा ड्रोन व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड (पंजाब) - पंजाबमधील गुरुदासपूरमधील बटाला शहरात गँगस्टर बबलू आणि पंजाब पोलिसांच्या चकमकीचा ड्रोन व्हिडिओ समोर आला आहे. या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर गुंड बबलूला पकडले आहे. यावेळी पोलीस आणि बबलू यांच्यात गोळीबाराच्या अनेक फेऱ्या झाल्या. ज्यात गुंड बबलू पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला. सध्या न्यायालयाने बबलूला १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. 8 ऑक्टोबर रोजी बटालाजवळील कोटला बोजा गावात पंजाब पोलीस कर्मचारी आणि गुंडांमध्ये जोरदार गोळीबार झाला होता. चार तासांच्या चकमकीनंतर शेतात लपलेल्या गुंडाला अटक करण्यात आली. प्रत्यक्षात पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान बबलू नावाचा गुंड आणि ड्रग्ज तस्कर पत्नी आणि मुलांसह जात होता. मात्र, पोलिसांना पाहून तो अचानक परतला, त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान, बबलू पत्नी आणि मुलाला सोडून बाईकवर पळून गेला, त्यानंतर कोटला बोजा सिंग गावात पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अटकेवेळी बबलूच्या हातात दोन पिस्तूल होते तसेच त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मूलही होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST