Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात मोसंबीची आरास - साडेतीन मुहूर्त
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 14, 2023, 12:44 PM IST
पंढरपूर : दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोसंबीच्या फळांनी सजले आहे. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोसंबीच्या फळांची आरास करण्यात आली आहे. आप्पासाहेब रामकृष्ण पाटील (मु.वाघाली ता.पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर) या भविकानं सात हजार मोसंबी फळांनी ही आरास केली आहे. यासाठी पाच टन मोसंबी लागले आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आराध्य दैवत मानले जाते. गुढी पाडवा,अक्षय तृतीया ,दसरा आणि बली प्रतिपदा या साडेतीन मुहूर्तावर मंदिर गाभाऱ्यात फुलांची, फळांची आरास केली जाते. दसऱ्याच्या दिवशी झेंडुंच्या फुलांची,गुडी पाडव्याच्या दिवशी आंब्याच्या फळांची आरस मंदिर गाभाऱ्यात केली जाते. आज दिवाळी पाडवा अर्थातच बली प्रतिपदा या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याला मोसंबीच्या फळांची आरास केल्यानं सावळ्या विठ्ठलाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे.