Diwali 2023 : दिवाळीत अमरावतीकरांसाठी सोन्याच्या वर्खाची 'गोल्डन फ्लॉवर' मिठाई, पाहा व्हिडिओ - दिवाळी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 8, 2023, 10:31 AM IST
|Updated : Nov 8, 2023, 12:16 PM IST
अमरावती : Diwali 2023 दिवाळीनिमित्तानं अमरावतीकरांसाठी शहरातील रघुवीर मिठाईच्या संचालकांनी खास सोनेरी वर्ख असणारी 'गोल्डन फ्लॉवर' ही मिठाई बाजारात आणली आहे. 11 हजार रुपये किलो असा या खास मिठाईचा दर आहे. शहरातील अनेकजण खास दिवाळीनिमित्त ही मिठाई खरेदीदेखील करत आहेत. 'गोल्डन फ्लॉवर' या खास मिठाईमध्ये मामरा बदाम काजू, पिस्ता, शुद्ध केशर वापरण्यात आले आहेत. खास राजस्थानमधील कुशल कारागिरांनी बनवलेली ही मिठाई शुद्ध 24 कॅरेट सोनेरी वर्खाने सजवण्यात आली आहे. अमरावती शहरासह रघुवीर मिठाईच्या वतीनं राज्यातील सांगली आणि मिरज या ठिकाणी देखील ही मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरावती शहरातील अनेक जण परदेशात स्थायिक झाले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून या मिठाई भांडाराने खास सोनेरी मिठाईचं वैशिष्ट्य जपलं. या मिठाईला अमरावतीकरांची पसंती मिळतेय.