Diwali 2023 : देशभरात दिवाळीची धूम, मंदिरांमध्ये उसळली भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - कोलकात्याच्या कालीघाट मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 12, 2023, 8:05 PM IST
नवी दिल्ली Diwali 2023 : देशभरात आज दिवाळीचा उत्साह आहे. रविवारी सकाळी देशातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली. पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या दिवशी काली पूजा आयोजित केली जाते. हा येथील प्रमुख सणांपैकी एक आहे. यावेळी शहरातील बाजारपेठा चांगल्याच गजबजल्या होत्या. तसेच कोलकात्याच्या कालीघाट मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही भाविकांनी प्रार्थना केली. यावेळी दिवे लावण्यात आले आणि पवित्र स्नान केल्या गेलं. दिवाळीच्या दिवशी, मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि देवाला छप्पन भोग चढवून आशीर्वाद घेण्यात आला. पाहा हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ