Different Wedding Card : लग्नपत्रिका संस्मरणीय राहण्याकरिता लढविली युक्ती; नोटबुकवरच छापली विवाहपत्रिका - 80 पानी नोटबुकवर लग्नपत्रिका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15096566-thumbnail-3x2-janhavi.jpg)
अमरावती - लग्न समारंभात लग्नपत्रिकेला विशेष महत्त्व ( unique wedding card in AP ) असते. सुंदर बनविलेल्या लग्नाची पत्रिका कितीही चांगल्या असल्या तरी त्या काही दिवसांनी विस्मरणात जातात. अनकापल्ली जिल्ह्यातील मुनागापाका येथील ( Anakapalli wedding card notebook ) विल्लुरी नुका नरसिंगराव यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका कायमची स्मरणात राहावी अशी इच्छा होती. त्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने ( different wedding invitation ) लग्नपत्रिका छापण्यात आल्या. लग्नपत्रिका नोटबुकच्या स्टाईलमध्ये छापण्यात ( innovative wedding card in AP ) आली होती. वर आणि वधू यांनाही संकल्पना आवडली आहे. पुढच्या बाजूला लग्नाचा तपशील आणि मागच्या बाजूला वधू आणि वरांचे फोटो अशी लग्नपत्रिका आहे. मध्यभागी 80 पानांसारखी नोटबुक आहे. प्रत्येक कार्डासाठी त्यांनी 40 रुपये खर्च केले आहेत. याप्रमाणे 700 लग्नपत्रिका छापून वितरित करण्यात आल्या. नातेवाईक आणि स्थानिक या कार्ड्सकडे उत्सुकतेने बघत आहेत. वराचे वडील नरसिंग राव ( Narsingh Rao on wedding card ) म्हणाले, की लग्नपत्रिका वेगळी आणि उपयुक्त असावी. लग्नपत्रिका लक्षात राहावी, अशी इच्छा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST