Dhammachakra Promotion Day : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० लाख अनुयायी येण्याची अपेक्षा; दीक्षाभूमी प्रशासनाची माहिती - कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 3, 2022, 8:18 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी ( Dikshabhoomi Smarak Samiti ) येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० लाख लोक येण्याची अपेक्षा असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दीक्षाभूमी परिसरात मुख्य सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे ( Bhadanta Arya Nagarjuna Surai Sasai ) राहणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Union Road Transport Minister Nitin Gadkari ), केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Union Social Justice Minister Ramdas Athawale ), राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे ( Devendra Fadnavis will Present as Chief Guests ) म्हणून उपस्थित राहणार आहेत. जगभरातले बाबासाहेबांचे अनुयायी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमी येथे येत असतात. अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिका जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे प्राथमिक सोईसुविधा दीक्षाभूमी परिसरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोलिसांकडून खबरदारीच्या योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्य दोन वर्षांनंतर होणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील दीक्षाभूमी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.