उद्धव ठाकरे हे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत 'हे ही नसे थोडके'; काळाराम मंदिरावरून फडणवीस यांचा टोला - काळाराम मंदिरात पूजा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 7, 2024, 8:07 PM IST
पुणे Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्याच दिवशी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पूजा करणार आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत 'हे ही नसे थोडके' असं फडणवीस म्हणाले. प्रदेश भाजपाच्या बैठकीनंतर शहर पुणे भाजपा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पुण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
तलाठी भरतीवरून नेत्यांनी केले आरोप : पुण्यात भाजपाची बैठक नियोजन बैठक होती. निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकारी याचं मत जाणून घेणं आणि संघटनात्मक चर्चा बैठकीत झाली आहे. या बैठकीत केवळ निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन याविषयावरच चर्चा झाली, कुठल्याही जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झालेली नाही. तलाठी भरतीवरून विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केले आहेत, त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. नुसत्या विधानावर कारवाई केली जात नाही.