Dahi Handi 2023 : महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारी दहीहंडी तरुणींनी फोडली - महिलांवरील अत्याचाराविरुद्ध स्वसंरक्षणाचा संदेश
🎬 Watch Now: Feature Video


Published : Sep 7, 2023, 5:19 PM IST
मुंबई Dahi Handi 2023 : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, स्त्री उद्योगवर्धिनी तसंच नन्ही परी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नवशक्ती सेवा मंडळ, आधारिका फाउंडेशन प्रस्तुत करी रोड येथील त्रिवेणी सदन इमारतीसमोर आज निर्भया दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध स्वसंरक्षणाचा संदेश देणारी ही दहीहंडी तरुणींनी फोडलीय. निर्भया दहीहंडी संघाचं वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडी संघात सर्व जाती धर्माच्या मुली सहभागी झाल्या आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना सकीना नावाच्या मुस्लिम मुलीनं सांगितलं की, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही त्यांचं कौशल्य आज दाखवत आहेत. महिलांवरील अन्यायाविरुद्ध महिलांनीच आवाज उठवला पाहिजे, असं देखील सकीनानं सांगितलं. निर्भया गोविंदा पथकातील मुलींनी महाकाली वेशभूषा करून आई तुझ्याच चरणी नृत्य सादर केलं. त्यानंतर आकर्षक मनोरे तयार करून दहीहंडी फोडली. या निर्भया गोविंदा संघात कराटे क्लासेसच्या मुलींनीही सहभाग घेतला.