Mumbai Crime News: अंतर्वस्त्रात आणि चपलाच्या तळव्यात लपवून ठेवलेले 140 कोटी रुपयांचे सोने केले जप्त; पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन परदेशी नागरिकांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. हे आरोपी १.४० कोटी रुपयांचे ३ किलो सोने अंतर्वस्त्रात आणि चपलाच्या तळव्यात लपवून नेण्याचा प्रयत्न करत होते. रविवारी एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली की, १० मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आली. तिन्ही परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबई विमानतळावर पोहोचले, असे अधिकाऱ्याने सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे त्यांना रोखण्यात आले. हे सोने त्यांच्या अंतर्वस्त्रात आणि चपलाच्या तळव्यात लपवले होते. सीमाशुल्क कायद्याच्या कलम ११० अन्वये सोने जप्त करण्यात आले आहे. प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. एकूण सोने ३ किलोपेक्षा जास्त होते. त्याची किंमत अंदाजे १.४० कोटी रुपये आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांना तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. 

Last Updated : Mar 12, 2023, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.